गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात घडणाऱ्या घडामोडींमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि वाद होताना दिसत आहेत. आर्यन खान प्रकरण, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर अशा अनेक मुद्द्यांवरून हे आरोप होत असताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्यांवरून विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेवरून देखील संजय राऊतांनी भाजपाला सुनावले आहे.