आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ड्रग्जपासून सुरु झालेले हे प्रकरण भ्रष्टाचारापर्यंत येऊन पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर एनसीबीनं मोठा निर्णय घेतला असून समीर वानखेडेंकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे.