Amravati ; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी पंचायत समिती गेट समोर ; पाहा व्हिडीओ
तिवसा (जि. अमरावती) : अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासूनचे मानधन न मिळाल्याने गुरुवारी तिवसा पंचायत समितीच्या गेट समोर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध नोंदवून लक्ष्मी पूजन करीत दिवाळी साजरी करण्यात आली. तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ४५ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे मानधन, प्रवास भत्ता, राहणीमान भत्ता व इतरही भत्ते थकीत असल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जातो आहे. दिवाळी सण असतानासुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधनाचा एकही रुपया जमा न झाल्याने दिवाळी साजरी करावी तरी कशी, असा सवाल कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर )
#amravati #grampanchat employee #bignews #esakal #sakalmedia