भाजपाने राज्याचे अल्संख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा उल्लेख भंगारवाला असा केला. यावर नवाब मलिक यांनी काही दिवांसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट, "होय मी भंगारवाला आहे" असं म्हणत उत्तर दिलं. तसेच, "माझे कुटुंबीय आजही हा व्यवसाय करत असल्याचा मला अभिमान आहे," असं म्हणत भाजपला प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवाब मलिक यांचा एक भंगारवाला ते राज्याचा कॅबिनेट मंत्री या प्रवासाबद्दल...