दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. म्हणूनच या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे1