परमबीर सिंग सीपी असताना आदित्य ठाकरे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचे; नितेश राणेंचे गंभीर आरोप

2021-11-02 998

भाजपा नेते नितेश राणे यांची पत्रकार परिषद आज मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर नितेश राणेंनी फोर सिझन पार्टीबद्दल मलिकांनी आदित्य ठाकरेंना विचारावं, असं म्हणत निशाणा साधला आहे. पत्रकारांनी परमबीर सिंग यांच्याबद्दल विचारले असता त्याला उत्तर देताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Videos similaires