मलिकांच्या आरोपांमुळे मलिक-फडणवीस नवा वाद सुरु; अमृता फडणवीसांनी ट्विट करत दिलं प्रत्युत्तर

2021-11-01 604

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण उघडकीस आणणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले. वानखेडेंच्या जन्मदाखल्यापासून ते त्यांच्या पहिल्या लग्नाच्या निकाहनाम्यापर्यंत संबंधित कागदपत्रे आणि फोटो पोस्ट करून वानखेडे खोटारडेपणा करत असल्याचं मलिकांचं म्हणणं होतं. यावरूनच समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गेले कित्येक दिवस सुरु होत्या. आता मलिकांनी आपला मोर्चा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळविला आहे.

Videos similaires