इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे राज्यभर आंदोलन; सायकल रॅली काढून नोंदविला निषेध

2021-10-31 51

देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. इंधन दरवाढीविरोधात युवासेनेकडून आज राज्यभरात सायकल रॅली आंदोलन केले गेले. युवासेना मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. डोंबिवलीत शिवसेनेकडून सायकल रॅली काढून पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदविण्यात आला. इंधन दरवाढ निषेध नोंदविण्यासाठी कारची बैलगाडी करण्यात आली होती. भांडुपमध्ये देखील आंदोलन करून केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

Videos similaires