अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर आज त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच आर्यन मन्नतवर पोहोचला. आर्यन खानला भेटण्यासाठी त्याचे आजी-आजोबा मन्नतवर उपस्थित असलेले पाहायला मिळाले.