मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर आज त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तब्बल २६ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. आर्यन खान मन्नतवर पोहोचताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.