क्रुजवरील ड्रग पार्टीसंदर्भात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. तब्बल २५ दिवसानंतर आर्यनला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असून जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखच्या 'मन्नत' निवासस्थानाच्या बाहेर चाहत्यांनी पोस्टर दाखवत, फटाके फोडून जल्लोष केला.