पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप; बेमुदत उपोषण
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी काल बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केलीय. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पुण्यात स्वारगेट परिसरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संप पुकारू, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय.
#pune #st strike #newsupdate #esakal #sakalmedia