मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी जन्मदाखला, पहिल्या लग्नाचे फोटो यानंतर आता समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा पोस्ट करत पुन्हा एकदा आरोप केले आहेत. समीर वानखेडे मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे आहे, असं मलिकांचं म्हणणं आहे. त्यांच्या या आरोपांचे खंडन करण्यासाठी वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा माध्यमांना याबाबत सप्ष्टीकरण दिले आहे.
#SameerWankhede #NawabMalik #DnyandevWankhede #AryanKhan #NCB #DrugsCase