#st #stticketexpensive #pune #punenews #ticketspricehike
सोमवारी एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तिकीट दरात 17.17 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्रति किलोमीटर २१ पैशांची दरवाढ झाली असून प्रतिकिलोमीटर 1 रुपया 45 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी महामंडळाने राज्य शासनाकडे तिकिट दरवाढीचा प्रस्ताव मांडला होता आणि सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. देशात आणि राज्यात दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती नवा उच्चांक गाठत आहेत याचाच फटका एस टी महामंडळा देखील बसला आहे. एस टी महामंडळाकडे तब्ब्ल १६,००० बसेस असून त्यातील १२,००० बसेस सध्या रस्त्यावर आहेत तर एकूण ९५,००० कर्मचारी आहेत. यातील अनेक बसेस डिझेलवर धावतात याच बसेस CNG तसेच इलेक्ट्रिक करायचा निर्धार महामंडळाचा आहे.
(प्रतिनिधी - अक्षय बडवे)