नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांना देखील टोला लगावला. "पैशाने निवडणूका जिंकता येत नाहीत. प्रताप पाटील चिखलीकरांना हरवण्यासाठी करोडो रुपये तुम्ही खर्च केले. पण जनतेने तुम्हाला नाकारलं", असं म्हणत फडणवीसांनी अशोक चव्हाणांना टोला लगावला आहे.