आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपा आणि ईडीवर गंभीर टीका केली असून ईडी म्हणजे पान तंबाखूचे दुकान झाले आहे. कोणाच्याही घरात घुसते आणि कोणालाही उचलून जाते, असे म्हटले आहे. सोलापूरमधल्या एका सांडपाणी व्यवस्था प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी त्या बोलत होत्या.