साकीनाका जंक्शन परिसरामध्ये होर्डिंग कोसळून दोन ते तीन नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये काही वाहनांचा देखील नुकसान झालं आहे. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा होर्डिंग या परिसरात लावला होता लोखंडी रोडच्या सहाय्याने हे होर्डिंग उभं करण्यात आलं होतं परंतु अचानक हे होर्डिंग कोसळलं आणि त्यामध्ये दोन ते तीन नागरिक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या सोबतच शेजारी पार्क करण्यात आलेल्या काही रिक्षा आणि इतर वाहनांचे देखील नुकसान झालेलं आहे .