ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली होती. या मुद्द्याला धरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक आणि उद्धव ठाकरे या दोघांवर टीका केली आहे. दरम्यान, ‘सामना’च्या अग्रलेखात आज मांडण्यात आलेली भूमिका म्हणजे वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.