Kolhapur ;साखर उद्योगाला अच्छे दिन, एकरकमी एफआरपी देण्यासाठी स्पर्धा ; पाहा व्हिडीओ

2021-10-23 84

गेल्या दहा वर्षात यंदा प्रथमच साखर उद्योगाला अच्छे दिन आले आहेत. साखर आणि इथेनॉलचे भाव वाढल्याने यंदा ऊसाला चांगला दर देणे कारखान्यांना शक्य होणार आहे. यामुळे चांगला दर देतानाच एकरकमी एफआरपी देण्यासाठी घोषणा करण्याची दक्षिण महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापुरातील कारखान्यांमध्ये स्पर्धाच सुरू झाली आहे...ऊसाला एकरकमी एफआरपी न देता ती तीन तुकड्यात द्यावी अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली. त्याला विरोध झाल्याने केंद्राने हात झटकत आपला याच्याशी काही संबंध नाही असे म्हणत एफआरपी एकरकमी देण्याचे निर्देश दिले. केंद्रानेही एफआरपीबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळं कारखानदारांना एकरकमी एफआरपी दर जाहीर करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

#suger industries#price hike#sugercain#breaking#esakal#sakalmedia

Videos similaires