ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात मनसेने पत्रकार परिषद घेत जास्मिन यांची पाठराखण केली आहे. तसेच जास्मिन वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही, असं मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलंय. नवाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावं, असं आव्हान देखील मनसेनं नवाब मलिक यांना दिलंय. जास्मिन वानखेडे या मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी राहिल्या आहेत.
#MNS #NawabMalik #NCB #jasminwankhede