पुणे शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डच्या निषेधार्थ, महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात शिवसेना पक्षाकडून अभिनव चौक ते टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कुलपर्यंत बैलगाडी चालवत खड्डा मणका आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांना भाजपा नेत्यांची नाव देऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.