केंद्रीय तपास यंत्रणा करत असलेल्या कारवाईंवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवला आहे. भाजपने ज्याठिकाणी त्यांचं सरकार नाही त्याठिकाणच्या मंत्र्यांच्या मागे केंद्रीय यंत्रणा लावल्या असून भाजपा सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन प्रतिउत्तर देण्याची वेळी आली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.