मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये केलेलं भाषण आणि त्यानंतर भाजपा नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियांचा समाचार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना केंद्र सरकारवही टीका केलीय. ज्या पद्धतीची वक्तव्य भाजपाचे नेते करत आहेत त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.