राज्यातील महिला आयोगाला आज अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. महिला आयोगाच्या आध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नावाची अधिकृत घोषणा होण्याआधीच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका , अशा आशयाचं ट्विट वाघ यांनी केलं आहे. यावर रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.