छत्रपती शिवरायांबद्दल नितांत आदर व प्रेम; अनावधानाने चूक घडल्याची आमदार नवघरेंची स्पष्टोक्ती

2021-10-14 6,599

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना अश्वारूढ पुतळ्याच्या अश्वावर चढून हिंगोलीतील राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी पुतळ्याला हार घातला. यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. याबद्दल आमदार नवघरे यांनी माफी मागितली असून ही चूक अनावधानाने झालेली आहे, असं ते म्हणाले आहेत. " मला छत्रपती शिवाजी महाराजांचा नितांत आदर आहे व त्यांच्यावर निस्सीम प्रेम आहे. अनावधानाने झालेल्या या प्रकाराबद्दल मी जाहीर माफी मागतो.", अशी स्पष्टोक्ती हिंगोलीतील वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी दिली आहे.

Videos similaires