मुंबईतील धारावी परिसरात करोना आटोक्यात ठेवण्यासाठी सुरुवातीपासूनच विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे धारावी मध्ये कोरोना संसर्ग हा नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. बुधवारी धारावी मध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान धारावी मध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. योग्य वेळी वैद्यकीय उपचार, विलगीकरण पाठपुरावा आणि चाचण्यांची वाढती संख्या यामुळे येथील संसर्गाचा उद्रेक नियंत्रित करण्यात आला आहे. धारावीतील करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेण्याचं आवाहन सहायक आयुक्त किरण दिगावकर यांनी नागरिकांना केलं आहे.