दहिसर येथे काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक वारकरी शिल्पाची विटंबना केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेवरून आचार्य तुषार भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी तातडीने दोषींना शोधून कठोर कारवाई करावी. तसेच महापालिकेने तातडीने या शिल्पाची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.