बीड शहर एसटी आगारातील कर्मचा-याचा वेळेवर पगार न झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बीड आगारातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाहीये. त्यामुळे यातील एका वाहन चालकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
#maharashtra #STBus #driver #suiside