महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विरोधी पक्षाकडून विरोध दर्शविला जात आहे. भाजपा प्रवक्ता गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेवर टीका केली आहे. महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात येत आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.