#dahiwadi #satara #lakhimpurkhairi #bharatband #mahavikasaaghadi
दहिवडी (सातारा) : माण तालुक्यात लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. दहिवडी येथे महाविकास आघाडीने मोर्चा काढून भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले तसेच मान्यवर उपस्थित होते. (व्हिडिओ : रुपेश कदम)