बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्चन त्यांनी ७० ते ८०च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले होते. पण ९०च्या दशकात बिग बींवर आर्थिक संकट कोसळले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अमिताभ बच्चन यांच्या ABCL या कंपनीवर जवळपास ९० कोटी रुपयांचे कर्ज होते असा खुलासा स्वत: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता.