#satara #sataranews #kaspathar #kasplateau #udayanrajebhosale
सातारा : कास धरणाची उंची वाढवण्याची संकल्पना साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष (कै.) श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज यांनी साकारली होती. त्यांची संकल्पना अस्तित्वात येत आहे याचा मनस्वी आनंद असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. कास धरण उंची वाढविण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतिम कामास त्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या वेळी त्यांनी कास येथे बोटिंग, प्रेक्षागॅलरी उभारणे इत्यादी प्रस्ताव लवकरच मंजूर करून घेऊन स्थानिकांच्या रोजगार वाढीचे सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)