#chandwad #heavyrainfall #rainfall #nashik #nashiknews
या पावसामुळे तालुक्यातील शिवनदीला पूर आला. या पुरामुळे पिंपळद ता चांदवड जवळ या शिवनदीवर पिंपळद ते वाळकेवाडी फाटा रस्त्यावर असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी होते. या पाण्यातून एका तरुणाने धाडसाने मोटारसायकल चालवत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा तरुण आपल्या मोटारसायकल सह नदीपात्रात पडला. सुदैवाने तो तरुण पट्टीचा पोहणारा असल्याने पोहत नदीच्या काठावर सुखरूप पोहचला व त्याचा जीव वाचला. नंतर ग्रामस्थांनी मदत करीत दोरखंडाच्या सहाय्याने त्याची मोटारसायकल ही बाहेर काढली.