#marathwada #aurangabad #marathwadaflood #ajitpawar
औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी मराठवाड्यात 48 लाख हेक्टर पैकी 32 ते 36 लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे सांगितले. नुकसानीचा संपूर्ण आकडा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय मंत्रालयाच्या स्तरावर घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. (व्हिडिओ : सचिन माने)