मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकत्र बसल्याचं पाहून त्यांच्याकडे पाहत, “इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… मला आठवले महायुतीचे गाणे”, असं म्हणत आठवलेंनी आपल्या खास शैलीत सेना भाजपा युतीचा उल्लेख केला. आठवलेची ही टोलेबाजी ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.