आपल्या भव्य दिव्य देखाव्यासाठी मुंबईतील अनेक नवरात्रोत्सव मंडळ प्रसिद्ध आहेत. ज्याप्रमाणे मुंबईत गणेशोत्सवामध्ये चलचित्र देखावे सादर केले जातात त्याचपद्धतीने नवरात्र उत्सवामध्ये देखील अनेक मंडळ विशेष सजावट चलचित्र आणि देखावे साकारतात. यातलेच एक मंडळ म्हणजे मुंबईतील प्रतिक्षानगर येथील मुंबईची माऊली. मुंबईची माऊली या नावाने प्रसिद्ध असलेल्या नवतरुण मित्र मंडळाचे यंदाचे हे २१ वे वर्ष असून त्यांनी तेलंगणा येथील लक्ष्मी नरसिंह मंदिराचा देखावा साकारला आहे.
#Navratri2021 #MumbaichiMauli