महिला आणि शेतकऱ्यांवरील अन्याय कधीच सहन करणार नाही : सुप्रिया सुळे

2021-10-06 49


उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबत विचारले असता 'कोणताही अन्याय महिलेवर किंवा शेतकर्‍यावर होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही.' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच 'युपी सरकारने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा गोष्टींवर कधीच बोलत नाही. बलात्कार झाला असेल तेव्हाही काही बोले नाहीत. त्यामुळे मला काहीच आश्चर्य वाटत नाही.' अशी भूमिका मांडत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Videos similaires