सातारा : महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मुकुंद माने, दीपक गाडे, संगीता शिंदे, रंजना जाधव, अमित मोरे, दामिनी निंबाळकर, भिकाजी सावंत आदी उपस्थित होते. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये सातारा, खंडाळा, फलटण, जावळी या तालुक्यांत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर तालुक्यामधील घटना अत्यंत घृणास्पद आहे. चाफळ येथे एकतर्फी प्रेमातून युवती बळी पडली असून, या घटना निंदनीय आहेत. या घटनेतील माथेफिरूंवर कडक कारवाई करावी. तसेच, राजकीय पाठबळ देणारांवरही कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#satara #sataranews #girlharrasment #sataragirlharrasment