Satara : माणदेशी अवकाश संशोधक 'विनायक'ने लावला लघुग्रहाचा शोध
Satara : अमेरिकन अवकाश संशोधन संस्था, नासाने सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये विनायक दोलताडे यांनी अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. नासा, पॅन स्टार्स, कॅटालीना स्काय सर्वे व हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास यांच्याकडून १ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये 'खगोल भूगोल वेद आणि विज्ञान" या त्यांच्या टीमकडून एका नवीन लघु ग्रहाचा शोध नोंदवण्यात आला. या टीममध्ये विनायक दोलताडे यांच्यासह आनंद कांबळे,संकेत दळवी, वैभव सावंत, मनीष जाधव, गौरव डाहुले यांचा समावेश आहे. या टीमने प्राथमिक अवस्थेत शोधलेल्या ह्या ग्रहाला (P11K6CL) सध्या KBV0001 असे नाव देण्यात आले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे.
#Satara