उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने मांजरा आणि तेरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावात पुराचे पाणी घुसले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तेरणा धरणाच्या पायथ्याला येऊन पाहणी केली. तर इस्थळ वाकडी तालुका कळंब येथे 17 जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अहिल्या घाठळ घटनास्थळी पोचले आहेत. तर एनडीआरएफ टीम येत आहे. (व्हिडीओ : सयाजी शेळके)