यवतामळमधील उमरखेड येथील दहागाव जवळ पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये सहा ते सात प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. सकाळी आठच्या सुमारास उमरखेडवरुन ही एसटी बस पुसद येथे जात असताना ही घटना घडली आहे. रात्री मुसळधार पावसामुळे दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. याच नाल्यावरून एसटीचालकाने ही बस नेल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
#STBus #Flood #Accident