काल आम्ही नाशिकच्या एका उप जिल्हा शल्य चिकित्सकाची स्टोरी केली होती. डॉ संजय गांगूर्डे, नाशिकचे उप जिल्हा शल्यचिकित्सक .. . त्यांना शासकीय रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता आणि त्यांच्यात कोणतीही लक्षणं नव्हती. ज्या वेळी ते संशयीत होते त्यावेळी ते घरीच क्वारंटाईन होण्यासाठी गेले होते मात्र त्यांच्या सोसायटीमधल्या लोकांना त्यांच्या वास्तव्यावर आक्षेप घेतला होता. शेवटी त्यांना शासकीय रूग्णालयात विलग करणय्ात आलं होतं. त्यांनी आपली व्यथा एका व्हीडीओच्या माध्यमातून व्यक्त केली होती. लोकमत डॉट कॉमनी या विषयाचं गांभिर्य ओळखून त्यांच्या संदर्भा नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशीही चर्चा केली होती. नाशिकच्या ईंडियन मेडीकल असोसिएशननी या वृत्ताची दखल घेऊन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली आमि त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर नांगरे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या सोसायटीच्या सभासदांना समज देऊन त्यांच्याकडून डॉ गांगूर्डे यांना कोणताही त्रास होणार नाही असं लिहून घेतलं होतं. त्यानंतर आता डॉ गांगूर्डे हे आपल्या कुटुंबासोबत घरी सुखानी राहात आहेत. लोकमतच्या पुढाकाराबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. मात्र अशा प्रकारे महामारीच्या काळात एखाद्या डॉक्टरला अशी वागणूक समाजाकडून मिळणं हे अतिशय दुर्देवी आहे. नाशिकच्या ईंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन डॉ गांगूर्डे सारख्या निष्णात डॉक्टरला न्याय मिळवून दिला ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. पाहूया गांगूर्डे आपल्या व्हीडीओमध्ये काय म्हणतात ते ....
#LokmatNews #lockdown #coronavirus #nashik
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here Fo