Ashti (Beed) : आष्टीकरांची पाण्याची चिंता मिटली
Ashti (Beed) : कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या आष्टी (Ashti) तालुक्यात यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पिके कोमेजून उत्पादन निम्म्यावर आले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धो धो कोसळलेल्या पावसामुळे मात्र एका रात्रीत दुष्काळ हटवला. तालुक्यातील सर्व तलाव ओसंडून वाहत आहेत. तालुक्यात सर्वात मोठा असलेला मेहेकरी तलावही रविवारपासून ओसंडून वाहू लागला आहे. सोमवारी सकाळी अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी घेतलेला व्हिडिओ.
#ashti #beed