Chafal (Satara) : एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून खून; कुटुंबीयांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
Chafal (Satara) : साताऱ्यातील चाफळ (ता पाटण) येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनिकेत मोरे (२२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे. आज मयत मुलीच्या कुटुंबीयांनी दहिवडी येथील विश्रामगृहासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेवून निवेदन दिले. तसेच न्यायाची मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे आस्थेने ऐकून घेवून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी वडूज येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी चाफळ व महाबळेश्वर घटनांबद्दल माहिती घेतली व चर्चा केली.
(व्हिडिओ : रुपेश कदम)
#AjitPawar #chafal #satara