Amravati : आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थी संतप्त
Amravati : आज होणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. त्यामुळे परीक्षेसाठी निघालेल्या विध्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. मात्र, सरकारच्या या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना मनःस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज अमरावती (Amravati) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारप्रति विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष दिसून आला. जवळजपास तासभर हे आंदोलन चालले.
#healthdepartmentrecruitmentexam #amravati