आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

2021-09-25 177

आरोग्य विभागाची गट क व गट ड परीक्षा ही २४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर या दिवशी होणार होती. मात्र ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याने परिक्षार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र आता या सहा हजारांहून अधिक पदांसाठी दलाली सुरु झाल्याचा गंभीर आरोप राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. एका पदासाठी पाच ते १५ लाखांची मागणी करत दलाली करणारे हे लोक कोण आहेत यासंदर्भात सरकारने तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

#DevendraFadnavis #RajeshTope