Indurikar Maharaj खरेच महिला विरोधी आहेत ? | Sex Determination Formula | Maharashtra News

2021-09-13 53

ईंदुरीकर देशमुख महाराज चा्ंगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विधानावर गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यालाच PCPNDT कायदा म्हणतात. तसं ईंदुरीकर महाराज हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांची कीर्तन सांगण्याची विनोदी शैली अनेकांना भावते ... अनेक सामाजिक प्रश्नांवर ते व्यंगात्मक पध्दतीनी टीका करतात. त्याची काही विधानं वादग्रस्तही राहिली आहेत. नाशिकजवळच्य ओझर ईथे त्यांनी मागच्या आठवड्यात एक वक्तव्य केलं होतं. “स्त्री संग (सोबत) सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते." असं विधान त्यांनी केलं होतं. अर्थात असं ज्ञानेश्वरी आणि भागवतात लिहिल्याचा दाखलाही ते देतात. कीर्तनकाराच्या शैलीमध्ये ते म्हणतात “भागवतातही तेच आहे, ज्ञानेश्वरीतही तेच आहे आणि हा ईंदुरीकर महाराजपण तेच म्हणतो”. त्यावरून त्यांच्याविरोधात वादळ उठलंय. कालपर्यंत अंधश्रध्दा निर्मुलन समितीनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी महाराजांच्या कीर्तनाच्या शैलीची प्रशंसा करत असतानाच, त्यांना चुक सुधरवण्याचं आवाहनही केलंय.

#LokmatNews #indurikarmaharaj #maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020