आपल्याला शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचं सेवन करणारे लोक माहीत असतील. मात्र, या दोन प्रकरांशिवाय विगन असा तिसरा प्रकारही आहे. शाकाहारी लोक भाज्या, फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. तर मांसाहारी लोकांच्या आहारात फळे, भाज्या, यासोबतच अंडी, चिकन, मासे या प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा देखील समावेश असतो. परंतु विगन लोक प्राण्यांपासून मिळणाऱ्या कोणत्याही पदार्थांचे सेवन करत नाहीत. हेच विगन पदार्थ ओळखता यावेत यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने(FSSAI) बाजारात मिळणाऱ्या विगन खाद्यपदार्थांसाठी एक नवा लोगो लाँच केला आहे.
#Vegan #FSSAI #Food #Health #Lifestyle #Logo #India