बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी यांचे शनिवारी (24 फेब्रुवारी) बाथटबमध्ये बुडून अपघाती निधन झाले. दुबईतील हॉटेलमध्ये ही घटना घडली. यानंतर कायदेशीर चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 27 फेब्रुवारीला त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. दरम्यान, श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज अंधेरीतील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये उपस्थित होते.