Dhanora (Beed) : बीड जिल्ह्यातील धानोरा परिसरातील शेती जलमय, गावांचा संपर्क तुटला
Dhanora (Beed) : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात गुरुवारी (ता.२३) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाने मांजरा नदी काठ, ओढे-नाले परिसरातील शेती जलमय झाली असून शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. सर्व पिके पाण्यात आहेत. सकाळी धानोरा - तटबोरगाव धानोरा - आपेगाव ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने काही तास वाहतूक बंद होती.
मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने तटबोरगाव येथील मांजरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे असून तटबोरगावचा संपर्क तुटला आहे.
(व्हिडिओ - अशोक कोळी)
#dhanora #BEED